मुंबई,-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या नोंदणीकृत पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची महत्वपूर्ण बैठक येत्या सोमवारी ७ तारखेला नवी दिल्लीतील कॉन्स्टिट्युशन क्लब मधील स्पीकर हॉल येथे आयोजित करण्यात आलीअसून,या बैठकीच्या अध्यक्षस्थानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित राहून मार्गदर्शन करतील, अशी माहिती प्रसिद्धीप्रकाद्वारे शनिवारी येथे देण्यात आली.
आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पक्षाच्या या राष्ट्रीय कार्यकारिणी च्या बैठकीला विशेष महत्व आहे.एनडीए चा घटक पक्ष म्हणून रिपब्लीकन पक्षाच्या भूमिकेला राष्ट्रीय राजकारणात महत्व प्राप्त झाले असून आगामी ५ राज्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपाइंच्या होत असलेल्या राष्ट्रीय कार्यकारीणीच्या बैठीकच्या निमित्ताने महत्वपूर्ण ठरणार आहे.
रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत रिपब्लिकन पक्षाची २५ सदस्यांची रिपब्लिकन वर्किंग कमिटी निवडण्यात येणार आहे. तसेच आगामी राजस्थान,तेलंगणा, मध्यप्रदेश,छत्तीसगड, व मिझोराम या राज्यांच्या निवडणुकीबाबत राष्ट्रीय कार्यकारीणी बैठकीत विचारविनिमय होणार आहे.रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारीणीच्या या बैठकीला रिपब्लिकन पक्षाचे देशभरातील सर्व राज्यांचे अध्यक्ष व सर्व आघाडीचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
…………..(समाप्त)………..
Average Rating