नागरिकांच्या पत्रांचा,निवेदनांचा केला निपटारा…
मुंबई,- जनतेची कामे रखडता कामा नये… विकासकामांचा तात्काळ निपटारा लागावा… कोण कामाचे पत्र घेऊन आले आणि दादा भेटले नाहीत असे होता कामा नये असा गैरसमज जनतेमध्ये जाऊ याची काळजी घेणारे उपमुख्यमंत्री अजित पवार अधिवेशन संपताच सुट्टीच्या दिवशीही जनतेच्या कामांचा निपटारा करताना शनिवारी मंत्रालयात दिसले.
विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन शुक्रवारी रात्री उशिरा संपले. मात्र विधानभवनात येऊन भेटता आले नसल्याने उपमुख्यमंत्री पवार यांनी सुट्टीच्या दिवशीही सकाळी आठ वाजताच मंत्रालयात येऊन नागरिकांकडून प्राप्त झालेल्या पत्रांचा आढावा घेतला तसेच कार्यवाहीबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचनाही दिल्या.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे तात्काळ निर्णयांसाठी… त्यांच्याकडील नस्त्यांचा तसेच कामांचा वेळेवर निपटारा करण्यासाठी ओळखले जातात. विधीमंडळ अधिवेशन काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्यासाठी,निवेदने व पत्रे देण्यासाठी नागरिकांची गर्दी होत होती.परंतु विधीमंडळ कामकाजातील व्यस्ततेमुळे सर्वच पत्रे,निवेदनांवर कार्यवाही होऊ शकली नव्हती. हे लक्षात घेऊन अधिवेशन संपताच पवार यांनी मंत्रालयातील त्यांच्या कार्यालयात येऊन सर्व प्रलंबित कामे निकालातही काढल्याने मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी वर्गात आश्चर्य व्यक्त केले जात आहेच पण या निमित्ताने पुन्हा एकदा पवारांच्या लोकाभिमुख कारभाराचा तसेच प्रशासकीय तत्परतेचा प्रत्यय पुन्हा एकदा बघायला मिळाला.
…………………(समाप्त)…….
Average Rating