मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा..
मुंबई-राज्यातील सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न पावसाळी अधिवेशनात करण्यात आला. अधिवेशनात ४१ हजार २४३ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटी शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
पुरवणी मागण्यांद्वारे प्राप्त निधी शेतकऱ्यांसाठी नमो सन्मान योजना, नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना मदत,महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना अशा सर्वसामान्यांसाठी असणाऱ्या विविध योजनांसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल,असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
विधानभवनात पावसाळी अधिवेशनाच्या समारोपानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार,उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील,आमदार प्रवीण दरेकर,आमदार मनीषा कायंदे उपस्थित होत्या.
……………..(समाप्त)…………..
Average Rating