सरकारने जनतेत विश्वासार्हता गमावली
मुंबई,-गृहमंत्र्यांनी अंतिम आठवड्याच्या प्रस्तावावर उत्तर देताना राज्यात कायदा सुव्यवस्थे बाबत सर्व आलबेल असल्याचं चित्र रंगवण्याचा प्रयत्न केला.मात्र प्रत्यक्षात सरकारने जनतेत आपली विश्वासार्हता गमावल्याची परखड टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शुक्रवारी सभागृहात बोलताना केली.
सत्ताधारी आमदारच राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचं काम करत आहे, त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. मग आम्ही न्याय कोणाकडे मागायचा असा सवालही दानवे यांनी यावेळी उपस्थित केला.
उपमुख्यमंत्री यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावर विस्तृत विवेचन केलं, मात्र खऱ्या परिस्थिती पासून सरकार तोंड लपवू शकत नाही अशी स्थिती आहे.सत्ताधारी पक्षाचे आमदार मोका लावलेल्या आमदारांसोबत फिरतात. राज्यातील अवैध धंदे यांच्यावर कारवाईची आवश्यकता असल्याचेही दानवे यांनी नमूद केले.
नैना प्रकल्प, सिडको जागा भूसंपादन व आरक्षण मुद्दा, इरसालवाडी दुर्घटना, तळीये गावाच पुर्नवसन, नाईट लाईफ, रिक्षा महामंडळ आदी विषयांवर मांडलेल्या भूमिकेबाबत गृहमंत्र्यांकडून कोणतेही उत्तर आले नसल्याबाबत दानवे यांनी नाराजीही व्यक्त केली.
…………………………..(समाप्त)…………….
Average Rating