वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची ग्वाही
मुंबई,-रत्नागिरी येथे प्राणीसंग्रहालयाच्या उभारण्यासाठी तज्ज्ञ सल्ल्यासह आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी येथे एका बैठकीत बोलताना दिली.
रत्नागिरी येथे प्राणी संग्रहालय उभारणीबाबत आज सायंकाळी विधान भवनात मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार भरत गोगावले, आमदार शेखर निकम, ज्येष्ठ भाजप नेते, प्रदेश प्रवक्ते व सामाजिक कार्यकर्ते माधव भंडारी, वन विभागाचे प्रधान सचिव व्ही. बी. रेड्डी, उप वनसंरक्षक विवेक होशिंग आदींसह वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुनगंटीवार म्हणाले की, रत्नागिरी येथे प्राणिसंग्रहालय उभारण्याची संकल्पना कौतुकास्पद आहे.महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून प्राणीसंग्रहालय साकारता येईल. प्राणीसंग्रहालयाच्या उभारण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करावा. त्यासाठी आवश्यक ते तांत्रिक सहकार्य करण्यात येईल. तसेच देशातील अन्य प्राणी संग्रहालयांची पाहणी करीत त्याच्या व्यवस्थापनाची माहिती करून घ्यावी. या प्राणी संग्रहालयामुळे कोकणातील पर्यटन वृद्धिसाठी निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वासही मंत्री मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. दरम्यान मुनगंटीवार यांनी प्राणी संग्रहाल्याच्या उभारणी संदर्भात विविध मौलिक सूचना केल्या. उद्योग मंत्री सामंत यांनी प्राणी संग्रहालयासाठी जागा उपलब्ध असून सिंधुरत्न योजनेंतर्गत निधी उपलब्ध होणार असल्याचेही यावेळी स्पष्ट केले.
……………………..(समाप्त)……
Average Rating