मुंबई,-राज्यातील दिव्यांग मुलामुलींच्या शाळा,कर्मशाळा व मतिमंद मुलांचे बालगृहाबाबत तीन महिन्यांच्या आत धोरण निश्चित केले जाईल,असे स्पष्ट आश्वासन मंत्री शंभूराज देसाई यांनी गुरुवारी विधानसभेत अड.आशिष जयस्वाल यांनी यासंदर्भात उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना दिले.
ते म्हणाले की, दिव्यांगाबाबत राज्य सरकार संवेदनशील असून दिव्यांग कल्याण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीने दिव्यांगांच्या शाळा, पदांना मान्यता देण्याचे निकष,धोरण काय असावे याचे प्रारुप सादर केले आहे. ते मान्यतेसाठी मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येईल.त्यानुसार तीन महिन्याच्या आत दिव्यांगाच्या शाळांसंदर्भात धोरण निश्चित केल्या जाईल.यामध्ये दिव्यांग कल्याण मंडळांच्या अध्यक्षांचाही सल्ला घेतला जाईल, असेही देसाई यांनी यावेळी स्पष्ट केले. आमदार बच्चू कडू यांनी या चर्चेत विविध उपप्रश्र्न विचारत सहभाग घेतला.
……………………..(समाप्त)………….
Average Rating