नवं 2024 वर्षाच्या माझ्या तमाम वाचकांना शुभेच्छा
आयुष्याच्या जिंदगानीचा
अत्तराचा “फाया” व्हावे..
जे सरले ते सोडून द्यावे
नवे नवे ते करत राहावे..
आयुष्याच्या जिंदगानीचा
अत्तराचा “फाया” व्हावे..
आली संकटे,येतील संकटे
काही काही गेली संकटे..
जगता जगता मागे टाकावी
सुटली नाही ती संकटे..
लिहीत राहावे,वाचत राहावे
जमेल तेवढे सांगत राहावे..
सोबत असली आपली नाती
जमेल तेवढे वाटत राहावे..
आयुष्य म्हणजे एक पसारा
जमेल तेवढे सावरत जावे..
कधी कधी नकाराला सकाराने
जमेल तेवढे आवरत जावे..
जे सरले ते सोडून द्यावे
नवे नवे ते करत राहावे..
आयुष्याच्या जिंदगानीचा
अत्तराचा “फाया” व्हावे..
आपला स्नेहांक